Video : शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा मोदींशी तुलना; सोशल मीडियावर भडका

PM Modi Shah Morphed video posted by Political keeda twitter handle on Delhi Elections
PM Modi Shah Morphed video posted by Political keeda twitter handle on Delhi Elections

सध्या सगळीकडे वारं आहे ते म्हणजे 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चं! हे वारं इतकं जोरात वाहतंय की आता राजकारणातही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. या चित्रपटातील काही सीनचे मॉर्फिंग करून एक व्हिडिओ तयार करण्यात आलाय. दिल्ली निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व केजरीवालांना दाखविण्यात आले आहे. हे मॉर्फिंग इतके भयंकर आहे की, सर्वच स्तरांतून त्यावर टीका होत आहे. 

पॉलिटीकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा, नरवीर तानाजी मालुसरेंच्या चेहऱ्यावर अमित शहांचा चेहरा तर उदयभान राठोड यांच्या चेहऱ्यावर अरविंद केजरीवालांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे. जसा कोंढाणा जिंकला तशीच आता दिल्ली जिंकयाची असे काही संवाद या व्हि़डिओत घेतलेत. तर, 'शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे,' असाही संवाद या व्हिडिओत घेतला आहे. तर व्हिडिओच्या शेवटी 'शाह जी' असे नाव लिहिले आहे. भाजपच्या अधिकृत अकाऊंटवर हा व्हिडिओ नसला तरी दिल्ली निवडणूकीच्या प्रचारानिमित्त हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. 

हा व्हिडिओ 19 जानेवारीला पोस्ट करण्यात आलाय. त्यानंतर सोशल मीडियावर या व्हिडिओवरून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर शिवाजा महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा लावल्याने पुन्हा एकदा त्याची तुलना केली असल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. 'आज के शिवाजी : नरेंद्र मोदी' या पुस्तकात शिवरायांची तुलना मोदींशी केली होती. हा वाद संपत नव्हता, तोच आता व्हिडिओवरून वाद सुरू झालेला बघायला मिळतोय.

भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर केली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील यादव यांना उतरविले आहे. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराला रंग भरू लागला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले खरे, परंतु वेळेत न पोचल्याने आता आज (मंगळवार) अर्ज भरणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com