
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेतलेल्या ‘महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा’ (सेट) होऊन ६५ दिवस झाले आहेत. मात्र, विशेष मागास प्रवर्गाच्या (एसबीसी) आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून अद्याप विद्यापीठाला अभिप्राय न आल्याने अद्याप सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. परिणामी सेट परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.