वेल्हे : बोरावळे (ता.राजगड) येथील रानडुकराच्या शिकार प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना मंगळवार (ता.०९) रोजी रात्री उशिरा घडली असल्याची माहिती राजगड वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी दिली..याप्रकरणी गुलाब बबन शिंदे (वय.40) संतोष बबन तळेकर (वय.45) शंकर बबन गोरे (वय.45) तिघेही राहणार बोरावळे (ता.राजगड), व बबलू शंकर बांदल (वय.40) व शांताराम कृष्णा खुटवड (वय.59) राहणार निगडे बुद्रुक (ता.राजगड) व भोर तालुक्यातील पारवडी येथील सहदेव विलास लिम्हण (वय.37), व राजाराम सदाशिव शिर्के (वय.52) अशा एकूण सात जणांना वनविभागाच्या कडून अटक करण्यात आली आहे..याबाबत अधिक माहिती देताना लांडगे म्हणाले,' आंबवणे वन परिमंडळ व वेल्हे वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बोरावळे येथे वन्य प्राण्याची शिकार केली असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाल्यानंतर वनविभागांच्या कर्मचाऱ्यांकडून येथे धाड टाकल्यानंतर रानडुकराचे मांस कापत असताना संबंधित आरोपी दिसून आले वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहिल्यानंतर सर्व आरोपी पळून जात असताना पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले..दरम्यान आरोपींकडून रानडुकराचे मांस व वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 2(16)9,39,48A,51 अन्वये गुन्हा दाखल केला असून संबंधित कारवाई पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, शितल राठोड, भोर सहाय्यक वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, वेल्हे वन परिमंडळ अधिकारी दया डोमे, वन परिमंडळ अधिकारी स्मिता अर्जुन, वैशाली हाडवळे, मंजुषा घुगे ,वनरक्षक ए.आर.सोनकांबळे, वनरक्षक वाय.बी.टीकोळे,सुनील होल्गीर,निखिल रासकर,एस.के.भैमुले, बी.एल.जगताप,राजेंद्र निंभोरे,स्वप्निल उंबरकार, अर्चना कोरके,अमोल गायकवाड,संतोष रणसिंग,यांच्या पथकाने यशस्वी कार्यवाही केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.