पुण्यातील 'हा' भाग सात दिवस बंद राहणार

हरिश शर्मा
सोमवार, 6 जुलै 2020

वाढती रुग्णांची संख्या खडकीकरांसाठी चिंताजनक   

खडकी बाजार (पुणे) : वाढती कोरोना बधितांची संख्या लक्षात घेत संपूर्ण खडकी कॅन्टोन्मेंट परिसर 9 ते 1५ जुलैपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा वगळून बंद करण्याचा निर्णय घेऊन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंह यांनी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर एम. जे. कुमार यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे.                                        

लॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क

खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात बाजार उघडण्याचा निर्णय घेण्याआधी फक्त 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. मात्र, खडकीतील नागरिक व व्यापारी यांनी बोर्डाकडे बाजार उघडण्यासाठी जोरदार मागणी केली. त्यामुळे बोर्डाने एका बाजूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला व तेव्हापासूनच खडकीत रुग्णांची संख्या वाढण्यास सुरवात झाली. काही दिवसांनी खडकीतील भाजी मंडई सुद्धा सुरू करण्यात आली. काही लोकांच्या सततच्या मागणीवरून खडकी बाजारात येणारे सर्व बंद असलेले रस्ते खुले करण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता दिवसागणिक रुग्ण वाढत आहे. त्यामुळे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी स्वतः खडकी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला व तसा प्रस्ताव बोर्डाच्या अध्यक्षांकडे पाठवला आहे. तसेच खडकी पोलिसांनी सुद्धा बोर्डाकडे खडकी बाजार बंद करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. त्यामुळे येत्या 9 ते 15 जुलैपर्यंत खडकी बाजार बंद करण्यात येणार आहे. खडकीत फक्त मेडिकल, पेट्रोल पंप, एटीएम, रेशन दुकान, दूध विक्री करणारी दुकाने फक्त सुरू राहतील .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven days off at Khadki