Pune : लग्नसोहळ्यातुन वधुच्या कुटुंबीयांचा सात लाख रुपयांचा ऐवज पळविला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
पुणे : लग्नसोहळ्यातुन वधुच्या कुटुंबीयांचा सात लाख रुपयांचा ऐवज पळविला

पुणे : लग्नसोहळ्यातुन वधुच्या कुटुंबीयांचा सात लाख रुपयांचा ऐवज पळविला

पुणे - पंचतारांकीत हॉटेलमधील लग्नसोहळ्यात वधुच्या कुटुंबीयांकडील रोख रक्कम, सोने-चांदीच्या वस्तु अशा सात लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरट्यांनी पळवून नेली. हि घटना खराडी भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रणजीत प्रसाद (वय 56, रा. वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारस प्रसाद यांच्या मुलीचा लग्नसोहळा खराडी बाह्यवळण मार्गावरील रेडीसन या पंचतारांकीत हॉटेल शुक्रवारी रात्री संपन्न झाला. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या पत्नीने त्यांच्याकडील रोख रक्कम, सोने-चांदीच्या वस्तु अशा सात लाख रुपये किंमतीचा ऐवज असलेली बॅग सभागृहातील खुर्चीवर ठेवली. त्यानंतर त्या कुटुंबासमवेत थांबल्या होत्या. त्यावेळी प्रसाद पती-पत्नीचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांची पिशवी चोरुन नेले. काही वेळानंतर हा प्रकार फिर्यादीच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी हॉटेलच्या सभागृहातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे करीत आहेत.

loading image
go to top