'सेव्हन मंत्रा’ने नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त असणारी खास बास्केट दिली उपलब्ध करून; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

मसाला बास्केटमध्ये काय आहे ?
मसाला बास्केटमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, लिंबू, पुदिना, ओल खोबरं, कोथिंबीर आणि कढीपत्ता आदींचा समावेश आहे. ही बास्केट २२५ रुपये किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बास्केटची तसेच इतर भाजीपाला आणि फळांच्या नोंदणीसाठी www.sevenmantras.com या वेबसाइटवर अगाऊ नोंदणी करता येणार आहे.

‘ॲग्रोवन -सेव्हन मंत्रा’तर्फे आजपासून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये वितरण
पुणे - कोरोनाच्या वाढत्या संकटात सुरक्षित, स्वच्छ, ताजा भाजीपाला आणि फळांसोबत ‘ॲग्रोवन -सेव्हन मंत्रा’ने नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त असणारी खास ‘मसाला बास्केट’ उपलब्ध करून दिली आहे. या बास्केटचे रविवारपासून (ता. २)  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वितरण होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सेव्हन मंत्रा’च्या वतीने भाजीपाला आणि फळांच्या पाच बास्केट वितरित केल्या जात होत्या. मात्र, ग्राहकांच्या खास मागणीवरून मसाला ही सहावी बास्केटही वितरित केली जाणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या काळात ‘सेव्हन मंत्रा’च्या वतीने ताजा भाजीपाला आणि फळे अत्यंत सुरक्षित वातावरणात ग्राहकांच्या थेट घरात पोचविला जात आहे. लॉकडाउनच्या काळातही या दोन्ही शहरांमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या बांधावरून या भाज्या आणि फळे सॅनिटायझेशनपासून सर्व उपाय करून ग्राहकांच्या घरापर्यंत पोचविल्या जात असल्याने त्याची विश्‍वासार्हता वाढली आहे.

कोरोनाची लस येईपर्यंत सर्वांनीच स्वतःची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी भर दिला आहे. त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या नैसर्गिक भाज्या स्वतंत्रपणे द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार खास मसाला बास्केट तयार केली आहे.

मसाला बास्केटमध्ये काय आहे ?
मसाला बास्केटमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, लिंबू, पुदिना, ओल खोबरं, कोथिंबीर आणि कढीपत्ता आदींचा समावेश आहे. ही बास्केट २२५ रुपये किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बास्केटची तसेच इतर भाजीपाला आणि फळांच्या नोंदणीसाठी www.sevenmantras.com या वेबसाइटवर अगाऊ नोंदणी करता येणार आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven Mantra provided a special basket that is useful for boosting the immune system