तुमची मोटरसायकल चोरीला गेली आहे का?, मग ती परत मिळू शकते, कशी ते वाचा सविस्तर

रवींद्र पाटे
Tuesday, 20 October 2020

नगर जिल्ह्यातील दोन सराईत मोटरसायकल चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून जुन्नर, आंबेगाव तालुक्यातुन चोरी केलेल्या १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत.

नारायणगाव : नगर जिल्ह्यातील दोन सराईत मोटरसायकल चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून जुन्नर, आंबेगाव तालुक्यातुन चोरी केलेल्या १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत. अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे साहय्यक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

या प्रकरणी भाऊ विठ्ठल दुधावडे (राहणार साकुर फाटा, तालुका संगमनेर,जिल्हा नगर), संतोष वाल्मीक पथवे (राहणार कोतुळ, तालुका अकोले, जिल्हा नगर) या मोटरसायकल  चोरांना सोमवारी (ता. १९) अटक केली असून, आरोपींना जुन्नर न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या बाबत गुंड म्हणाले १७ ऑक्टोबर २०२० रोजी नारायणगाव बस स्थानकाच्या आवारातून व्यापारी सुदीप सुनील कसबे यांची दुचाकी चोरीला गेली होती. तपासात ही दुचाकी भाऊ दुधावडे, संतोष पथवे यांनी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. गुंड यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के, पोलिस नाईक शेख, पोलिस शिपाई साबळे, पोलिस शिपाई कोबल, पोलिस शिपाई लोहोटे, पोलिस शिपाई वाघमारे या पथकाने आरोपींना अटक केली.

तपासात जुन्नर, आंबेगाव तालुक्यातून सात मोटरसायकलची चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. या दुचाकी पोलिसांनी जप्त करून नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये जमा केल्या आहेत. दुचाकी मालकांनी नारायणगाव पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन गुंड यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुचाकींचे वर्णन पुढीलप्रमाणे: 
स्प्लेडर चासी नं: MBLHA10EYBHC17255,
स्प्लेडर चासी नं: 97H19FJ4592, सीडी डॉन चासी नं: 05J27FO924,पल्सर  चासी नं: MD2DHZZPCM54963, डिस्कव्हर चासी नं:
MD2DSPAZZSWJ59596, स्प्लेडर चासी नं: MBLHAW080KSF10446,डिस्कव्हर चासी नं: MOZDSDXZZNAD03911

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven motorcycles seized from thieves