Vidhan Sabha 2019 : पुण्यातील 'या' प्रमुख बंडखोरांनी घेतली माघार !

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

आणा- भाका घेत आणि कमिटमेंट मिळाल्यामुळे शहरातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख बंडखोरांनी सोमवारी माघार घेतली. त्यामुळे पुण्यात भाजप- शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, अशी सरळ लढत होणार आहे.

पुणे : आणा- भाका घेत आणि कमिटमेंट मिळाल्यामुळे शहरातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख बंडखोरांनी सोमवारी माघार घेतली. त्यामुळे पुण्यात भाजप- शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, अशी सरळ लढत होणार आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे, भाजपच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे शहराध्यक्ष डॉ. भरत वैरागे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सदानंद शेट्टी, खडकवासला मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, कसबा मतदारसंघातून माजी महापौर आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कमल व्यवहारे, वडगाव शेरी मतदारसंघातून नगरसेवक संजय भोसले यांनी रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आठही मतदारसंघातून युती विरुद्ध आघाडी अशी सरळ लढत होणार आहे.

बंडखोरी करणारे अनेक जण नगरसेवक होते, तसेच निवडणूक जिंकण्याचाचा त्यांनी निर्धार केला होता. परंतु, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शहर पातळीवरील नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि या बंडखोरांची समजूत घातली, त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेण्यात आले आहेत.

काँग्रेसच्या सर्व बंडखोरांना थंड करण्यात पक्षाला यश आले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकही प्रमुख बंडखोर आता रिंगणात उरला नाही. कॉंग्रेसचे उमेदवार असणाऱ्या तीनही मतदारसंघात भाजपशी थेट लढत होईल. तसेच, भोर विधानसभा मतदारसंघात भाजपचे किरण दगडे यांनाही माघार घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven rebel candidate withdraw nomination in pune