MPSC Appointment Letter
sakal
पुणे
MPSC Appointment Letter: मेळाव्याची चमकोगिरी करण्यासाठी नियुक्तीपत्रं अडवली, MPSCतून नोकरी मिळूनही बेरोजगार राहण्याची वेळ
Delay in MPSC clerk typist appointment letters 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपिक-टंकलेखक भरती प्रक्रियेत निवड झालेले सात हजार उमेदवार अद्याप नियुक्तिपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या रोजगार मेळाव्यातील ‘चमकोगिरी’मुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.
प्रज्वल रामटेके
पुणे : ‘‘माझे आई-वडील शेतमजुरी करतात... माझी नोकरी लागेल... आमचे दिवस पालटतील.... घरचे दारिद्र्य दूर होईल.... अशी त्यांची खूप मोठी अपेक्षा होती. आम्ही तीन वर्षांपासून रात्रंदिवस मेहनत घेतली. आज निवड होऊनही सरकार फक्त मेळाव्याच्या ‘चमकोगिरीसाठी’ आमचे नियुक्तिपत्र अडवून बसले आहे.