
NHM Scam
Sakal
ज्ञानेश्वर भोंडे
पुणे : राज्याच्या आरोग्य विभागात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या (एनएचएम) दोन ते अडीच हजार कर्मचाऱ्यांकडून सेवेत कायम करण्यासाठी ७० ते ७५ कोटी रुपये रोख स्वरूपात घेतल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे हे पैसे ‘एनएचएम’मध्ये काम करणाऱ्या १३ कर्मचारी व अधिकारी यांनीच गोळा केले असल्याचा संदेश त्यांचे नाव व रकमेच्या आकड्यांसहित समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. पैसे देऊनही काम न झाल्याने हे पैसे परत करावेत, अशी मागणी आता कर्मचारी करू लागले आहेत.