

One and a Half Hours for 1.5 km: Traffic Chaos in Warje
Sakal
पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात आला. त्यामुळे येथील प्रश्न सुटला असला तरी वाहतूक कोंडीचे नवे ठिकाण आता वडगाव पूल ते मुठा नदीचा पूल (वारजे) असे झाले आहे. सुमारे दीड किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना एक ते दीड तास कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून दररोज सुमारे दीड लाख वाहनांची वाहतूक होते. या चालकांना कोंडीचा फटका बसताे.