मोदींवर पूर्ण विश्वास, ६ महिन्यात राज्यात उद्योग येतील; सत्तार यांचा छातीठोक दावा

abdul sattar
abdul sattar esakal
Updated on

मुंबई - वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दररोज यावरून राजकीय टीका टीप्पणी होत आहे. सत्ताधारी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार पर्यायी उद्योग येतील असं सांगत आहेत. तर विरोधक राज्याचं नुकसान झाल्याचं सांगत आहेत. त्यातच आता शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. (Abdul Sattar news in Marathi)

abdul sattar
राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा म्हणजे केवळ मनोरंजन; नारायण राणेंचा हल्लाबोल

अब्दुल सत्तार म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात त्यांच्यावर विश्वास आहे. पुढील सहा महिन्यात राज्यात नवीन उद्योग येतील, याची मला खात्री आहे. हे दोन महिन्यांचं किंवा दीड महिन्यांचं सरकार नाही. मागच्या सरकारने अडीच वर्षांत सरकारने काय प्रयत्न केले, कसे प्रयत्न केले, कशामुळे प्रकल्प तिकडे गेला हे दोन्ही सरकारचं काम पाहिल्यावर कळेल असंही सत्तार म्हणाले.

याआधी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी देखील राज्यात उद्योग आणण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचं म्हटलं. आता आमचे उद्योगमंत्री पुढे काम करतील. सरकारला जागेवर बसू तर द्या. शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती का घडली नाही, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

abdul sattar
राहुल गांधींच्या भाजपकडून होणाऱ्या ट्रोलिंगवर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले...

शरद पवार यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला होता. पवार म्हणाले होते की, "वेदांता प्रकल्पाच्या बदल्यात दुसरा मोठा प्रकल्प देण्याचं आमिष केंद्र सरकारकडून दाखवलं जात आहे. मात्र याला काही अर्थ नाही. ही तर लहान मुलांची समजूत काढल्यासारखं आहे. पण तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. वेदांताकडून असे अनेक प्रकल्प गुजरातला हलवले आहेत. त्यामुळे आता यावर चर्चा करून काही फायदा नाही" असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Farmer Earns Premium Price as Sugarcane Fetches ₹5,000 Per Tonne
solapur city
The Pune Municipal Corporation has approved medical assistance for the families of former corporators under its contributory healthcare scheme.
Students Get Financial Boost as Monthly Hostel Meal Grant Raised to ₹3,200
Marathi News Esakal
www.esakal.com