Sex Toys: पुण्यातील तरुणाईला 'सेक्स टॉईज'च वेड? तब्बल १० लाखांचे टॉईज जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Sex Toys: पुण्यातील तरुणाईला 'सेक्स टॉईज'च वेड? तब्बल १० लाखांचे टॉईज जप्त

पुणे - विद्येचं माहेरघर मानलं जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील तरुणाईला सेक्स टॉईजचं वेड लागलय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात आज १० लाख रुपये किमतीचे सेक्स टॉईज (sex toys) जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा: सच्चा मुसलमान कधीच भाजपला मत देऊ शकत नाही; सपा आमदाराचं विधान

पुण्यातील लष्कर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी शहरातील एका गोडाऊनमधून १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर कलम २९२, २९३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Recruitment: आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती; गिरीश महाजन यांची घोषणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्या सगळ्या वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू होती. याप्रकरणी तपास सुरू असून त्या गोडाऊनमध्ये असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काही अल्पवयीन मुलांना हे विकल्या जात होते का याचा तपास पोलीस घेत आहेत.