esakal | अल्पवयीन मुलीवर महाविद्यालयीन मित्राकडून लैंगिक अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

Sexual Abuse

अल्पवयीन मुलीवर महाविद्यालयीन मित्राकडून लैंगिक अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाविद्यालयीन मित्राने प्रेमसंबंधातुन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर गोवा येथे नातेवाईकांकडे गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गोव्यातील मापुसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गोवा पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी हडपसर पोलिसांकडे वर्ग केला.

कुणाल पटेल (रा. फातीमानगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी सतरा वर्षाची असून तिचे व पटेल याचे महाविद्यालयात असताना प्रेमसंबंध जुळले. फेब्रुवारी 2019 त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, मुलगी तिच्या गोव्यातील नातेवाईकांकडे गेली. त्यावेळी मुलगी गर्भवती असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला गर्भपात करण्यासंबधी सांगितले. मात्र तिने गर्भपात न करता मुलाला जन्म देऊन त्याचा सांभाळ करण्याचे नातेवाईकांना सांगितले. तिला गोव्यातील एका रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने याबाबत मापुसा पोलिसांना कळविले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पिडीत मुलीने एका मुलाला जन्म दिला असून ते मुल आता एक वर्षाचे झाले आहे. मापुसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपासासाठी हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

loading image
go to top