Pune: माणुसकीला काळीमा फासणारी घटना! 13 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Pune: माणुसकीला काळीमा फासणारी घटना! 13 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या 13 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. ओळखीतल्या व्यक्तीनेच हे दुष्कृत्य केले आहे. या व्यक्तीविरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरात एक मजुरी करणारे दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्या दाम्पत्याला 13 महिन्यांची चिमुकली आहे. या चिमुकलीच्या वडिलांच्या मित्रानेच हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे. आई-वडिलांना बाहेर जायचे असल्याकारणाने वडिलांनी त्यांची चिमुकली मित्राकडे काही वेळासाठी दिली होती. लहान मुलीकडे मी लक्ष देतो आणि काळजी घेतो, तुम्ही बिनधास्त जा असे म्हणत त्या व्यक्तीने घरात प्रवेश केला.

मित्र असल्याकारणाने बाळाची काळजी घेतली जाईल असा विश्वास वाटल्यामुळे ते दाम्पत्य बाहेर निघून गेले. याचाच फायदा घेत या नराधमाने दुपारच्या वेळी या लहान बाळावर लैंगिक अत्याचार केले. घरी आल्यावर आपलं बाळ रडत असल्याकारणाने आई-वडिलांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपीवर कलम 376 अन्वये आणि पोक्सोॲक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Pune Newscrime