esakal | कचरवाडी येथे कृषिकन्येकडून जनावरांसाठी लसीकरण शिबिर
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination_Camp

बदलत्या हवानामामुळे जनावरांना होणाऱ्या आजाराबद्दल आणि त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कचरवाडी येथे कृषिकन्येकडून जनावरांसाठी लसीकरण शिबिर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बावडा (इंदापूर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषिकन्या शामल कल्याण भगत हिने कचरवाडी (ता. इंदापूर) येथे जनावरांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ. सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी डॉ. पाटील यांनी जनावरांची तपासणी करून त्यांना लसीकरण केले. तसेच बदलत्या हवानामामुळे जनावरांना होणाऱ्या आजाराबद्दल आणि त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिराअंतर्गत कचरवाडीतील एकूण ५० जनावरांचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये २० गाई, २० म्हशी आणि १० वासरांचा समावेश होता. लसीकरणावेळी जनावरांना एच.एस.बी.क्यू.ही लस टोचण्यात आली. हे शिबिर आयोजित करण्यासाठी शामलला कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. व्ही. बगाडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतर विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केले. 

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत कृषी महाविद्यालयामार्फत कृषिदूतांकडून अनेक प्रात्यक्षिके करून घेतली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शामलने निंबोळी अर्काचा वापर आणि शेतमालाची ऑनलाईन विक्री कशी करावी याबाबत गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तिने मार्केटयार्ड या शेतमालाच्या ऑनलाईन विक्री संदर्भात असलेल्या अॅपबद्दल माहिती दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image