शनिवारवाडा महोत्सवाचे येत्या रविवारी आयोजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

येथे प्रवेशिका मिळतील 

  • मित्रमंडळ चौक, मॅरेथॉन भवन - सकाळी साडेअकरा ते सायं. ६ पर्यंत
  • प्रभात रस्ता, मनीषा नृत्यालय - सायंकाळी सहा ते आठ
  • बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह - शुक्रवार (ता. १४) आणि शनिवार (ता. १५)
  • महोत्सवाच्या दिवशी (ता. १६) सकाळी ११ नंतर

पुणे - शास्त्रीय नृत्य आणि संगीत यांचा मिलाफ असलेल्या शनिवारवाडा नृत्य महोत्सवाचे रविवारी (ता. १६) आयोजन करण्यात आले आहे. शनिवारवाड्याच्या प्रांगणात संध्याकाळी साडेसहा वाजता हा महोत्सव सुरू होईल. गणेशवंदना, भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याविष्कार ही यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती कल्पना आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शुमिता महाजन विद्यार्थिनींसमवेत गणेशवंदना, वैभव आरेकर यांनी भरतनाट्यममधून सादर केलेली वारकरी संप्रदायाची महती आणि दिल्लीच्या अभिमन्यू लाल आणि विधा लाल यांनी सादर केलेला कथ्थक नृत्याविष्कार यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे. महोत्सवाच्या कार्यकारिणीमध्ये जॅकी श्रॉफ, सबीना संघवी, गायत्रीदेवी पटवर्धन, मनीषा साठे, वर्षा चोरडिया, नीलम सेवलेकर, पारूल मेहता, मौसमी सणस आणि महोत्सव समन्वयक तानाजी जाधव यांचा समावेश आहे. 

यंदाच्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक रोझरी स्कूल असून, सहप्रायोजक वीकफिल्ड, फाइव्ह एफ वर्ल्ड, ऑक्‍सफर्ड ग्रुप, हॉटेल ओ, प्युअर गोल्ड चॉकलेट, जॅकी श्रॉफ आणि ‘सकाळ’ आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, याप्रमाणे आसनव्यवस्था उपलब्ध करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shanivarwada Dance Mahotsav in pune