

Budhwar Peth Pune roads in poor conditions
Sakal
पुणे : शहरात सीसीटीव्हींसाठी रस्ते खोदाई करताना नियमावली तयार केली आहे. यावर महापालिकेचे अभियंते नियंत्रण ठेवणार आहेत. मात्र, काही दिवसांपासून शहरात सीसीटीव्हींसाठी खोदाई करताना ठेकेदाराने नियमावलीकडे दुर्लक्ष करत वाटेल तेथे केबल टाकण्यासाठी खड्डे खोदले आहेत. पण ते वेळेत न बुजविल्याने मध्यवर्ती भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाने पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यात सीसीटीव्हीचा मोठा प्रकल्प जाहीर केला आहे. सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्यासाठी जिल्ह्यात १६०० किलोमीटर लांबीचे रस्ते खोदावे लागणार आहेत.