

Historic Shantabai Shelke Wada Site in Manchar to Become Memorial With Study Room and Competitive Exam Centre
esakal
-डी.के.वळसे पाटील
मंचर : ज्येष्ठ कवयित्री (स्व.) शांताबाई शेळके यांच्या बालपणीच्या आठवणींशी निगडित मंचर येथील ऐतिहासिक वाडा कोसळल्यानंतर त्या जागेवर भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येणार असून, तेथे अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येईल, असे माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवारी(ता.२३) वळसे-पाटील यांनी कोसळलेल्या वाड्याची पाहणी केली.