RTE Admission Deadline Extended to May 8: Final Opportunity for Parents
sakal
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता आठ मेपर्यंत पालकांना कागदपत्र पडताळणी करून प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे ७२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.