Sharad Pawar on Modi Guarantee
Sharad Pawar on Modi Guarantee

Sharad Pawar on Modi Guarantee: मोदींच्या गॅरंटीवर शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, "गॅरंटीच्या कार्डवर तारीखच नाही"

पुण्यात एका जाहीर सभेत बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या प्रचारावर सडकून टीका केली.

पुण्यात एका जाहीर सभेत बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या प्रचारावर सडकून टीका केली. सध्या टीव्हीसह वर्तमानपत्रातून आणि स्वतः मोदींच्या जाहीर भाषणातून मोदींची गॅरंटी हे शब्द वापरले जात आहेत.

पण या गॅरंटी शब्दावरच आता शरद पवारांनी टोला लगावला आहे. मोदींच्या या गॅरंटी कार्डवर तारीखचं नाही, हे सर्वकाही फसवं आहे, अशा शब्दांत पवारांनी मोदींच्या आणि भाजपच्या प्रचारावर सडकून टीका केली. (sharad pawar attack pm modi guarantee Says there is no date on the warranty card)

महविकास आघाडी इंडिया फ्रंटच्यावतीने काँग्रेस भवन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी शरद पवार म्हणाले, "केंद्र सरकारनं अनेक योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांना ते मोदींची गॅरंटी म्हणत आहेत. पण या गॅरंटी कार्डवर तारीख नाही, त्यांनी जनतेला दिलेलं वचन पूर्ण केलेलं नाही. सध्या देशातील शेतकरी निराशेच्या गर्तेत आहे. (Latest Maharashtra News)

मनमोहन सिंग यांच्या काळात आपण पाहिलं की, शेतकरी कर्जबाजारीपणामुळं आत्महत्या करत होते. त्यावेळी सरकारनं शेतकऱ्यांचं ७० हजार कोटींचं कर्ज माफ केलं होतं. सध्या शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे पण सरकारचं त्यांच्याकडं लक्ष नाही. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, त्यामुळं ते आता घालवायलाच हवं.

पवार म्हणाले, "नेहरूंनी देश प्रगतीच्या मार्गावर नेला हे संपूर्ण जग मान्य करते आहे, मात्र मोदी ते मान्य करत नाहीत. राज्यकर्ते सामांन्यांचे हिताचे रक्षण करणारे आहेत, असे मला वाटत नाही. आम्ही शेतकऱ्यांचे सत्तर हजार कोटीचे‌ कर्ज माफ केले, आणि मोदी‌ सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. पंजाब, हरीयाना, मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी जादा अन्नधान्य निर्मिती करून देशाला जगविले. आज याच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडे सरकार लक्ष देत नाही."

Sharad Pawar on Modi Guarantee
Pune Girls Drug Matter: ड्रग्ज घेऊन तरुणी आऊट ऑफ कन्ट्रोल! अभिनेत्यानं शेअर केला काळजीत टाकणारा व्हिडिओ

सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचे सांगत पवार म्हणाले, "देश एकसंघ ठेवण्याचे, राज्य व केंद्र यांच्यात समन्वय साधण्याचे काम नेहरू, इंदीरा गांधी व अचलबिहारी वाजपेयी यांनी केले. मात मोदींची राज्यांच्याबाबतची भूमिका असहकार्याची आहे. त्यामुळे अनेक राज्याचे प्रश्न प्रलंबीत आहेत. (Latest Marathi News)

मोदींनी भाषणात सांगितले, की राष्ट्रवादीने बँकेत, जलसिंचनात भ्रष्टाचार झाला. माझे त्यांना आवाहन आहे, की देशातील तपास‌यंत्रणांनी तपास करून देशातील जनतेसमोर त्याचा अहवाल ठेवावा. केजरीवाल स्वच्छ व चांगले काम करणारे मुंख्यमंत्री आहेत, त्यांना अटक करण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. संजय राऊत, अनिल देशमुख यांना खोट्या आरोपा खाली तुरुंगात ठेवले, सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकणे, दबाव टाकण्यासाठी केला जात आहे. सत्तेचा गैरवापर कसा केला दाते, याची अनेक उदाहरणे सत्ताधाऱ्यांनी देशासमोर ठेवली आहेत. विरोधी विचारावर घाव घालण्याचे‌काम सुरू आहे. हे बदलण्यासाठी आणि भाजप विरुद्ध सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com