

Sharad Pawar claims his advice to PM Modi and NEET protest leaders helped resolve the agitation
Esakal
पुणे : जंतरमंतर येथे नीट पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलक विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधण्यास सांगितले होते. त्याचवेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांनाही सरकारशी चर्चा करावी असा सल्ला दिला होता. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या चर्चेमुळे प्रश्न सुटला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा देशातील तरुणाईच्या संघर्षाचा विजय असून सरकारला त्यांच्या भावनांपुढे झुकावे लागले, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.