पुणे पोलिसांकडून सत्तेचा गैरवापर, एसआयटीमार्फत चौकशी करा : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

एल्गार परिषदेतील भाषणांवरून त्यांना देशद्रोही ठरविणे चुकीचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

पुणे : एल्गार परिषदेसंदर्भात पुणे पोलिसांकडून सत्तेचा गैरवापर केला गेला. पुणे पोलिसांकडून मुलभूत स्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली. सामाजिक कार्यकर्त, साहित्यिकांनी कारागृहात डांबून ठेवणे चुकीचे आहे. एल्गार परिषदेतील भाषणांवरून त्यांना देशद्रोही ठरविणे चुकीचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात 1 जानेवारी 2017ला एल्गार परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत साहित्यिकांना अटक केली. या कारवाईवरून शरद पवार यांनी भाजप सरकार आणि पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शरद पवार यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

सरकारकडून धार्मिक व सामाजिक ऐक्यास धोका : शरद पवार

शरद पवार म्हणाले, की पुणे पोलिसांची कारवाई आक्षेपार्ह आहे. हत्येची, धमकेची पत्र आली म्हणून राष्ट्रद्रोहाचे खटले चालविणे चुकीचे आहे. एल्गार परिषदेतील भाषणे राष्ट्रद्रोह कसा समजायचा. लोकशाहीत तीव्र भावना व्यक्त केल्या जातात. पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह आहे. पुणे पोलिसांकडून सत्तेचा गैरवापर केला आहे. टीका केली म्हणून राष्ट्रद्रोही ठरविले जाते. सुधीर ढवळेंनी दलितांसाठी आयुष्य घालविले. सुधा भारद्वाज तर अमेरिकेतून आल्या होत्या. दलित समाजासाठी योगदान दिलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर एसआयटी नेमण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. माजी न्यायमूर्तींची विशेष चौकशी समिती नेमावी. पत्रक सापडले म्हणून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. सुधीर ढवळे यांनी वाचलेल्या दोन ओळींसाठी तुरुंगात ठेवले हा सत्तेचा गैरवापर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar criticized Pune Police for elgar Parishad Pune