केंद्र सरकारचे धोरण शेतकरी हिताचे नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

-कांदा व्यापारावरील निर्बंधाबाबत शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका

पुणे : "कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणि आयातीला पाठिंबा हे केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, असे वाटत नाही," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. पुणे (मांजरी) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे मंगळवारी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका

पवार म्हणाले, "राज्यात कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना सध्या समाधानकारक भाव मिळत होता. परंतू केंद्र सरकारच्या व्यापारावरील निर्बंधामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या संदर्भात नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची उद्या चर्चा करणार आहे."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला असताना केवळ आठ ते दहा रुपये किलो रुपये भाव मिळत होता. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नव्हता. चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांदा साठवला. थोडाफार शिल्लक राहिलेल्या कांद्याला बाजार समाधानकारक दर मिळत आहे. परंतु नुकसान पाहता शेतकऱ्यांचा हातात काही राहणार नाही, अशी स्थिती आहे. कांदा व्यापारावरील निर्बंधामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या कांद्याच्या प्रश्नावर नाशिक, नगर जिल्ह्यासह विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar criticizes central government over farmers' policy