बारामतीतील ‘तो’ फ्लेक्‍स अखेर उतरविला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समर्थनार्थ येथील तीन हत्ती चौकात लावलेला फ्लेक्‍स काही वेळातच काढून टाकण्यात आला. काही कार्यकर्त्यांनीच हा फ्लेक्‍स आपणहून उतरविला असल्याचे पुढे आले.

बारामती - ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समर्थनार्थ येथील तीन हत्ती चौकात लावलेला फ्लेक्‍स काही वेळातच काढून टाकण्यात आला. काही कार्यकर्त्यांनीच हा फ्लेक्‍स आपणहून उतरविला असल्याचे पुढे आले.

अजितदादांची ‘वाट’ नेमकी कोणत्या दिशेला?

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीत शरद पवार यांच्या समर्थनार्थ फ्लेक्‍स लावण्यात आला होता. त्याची मोठी चर्चा माध्यमातून झाली.

‘आम्ही ८० वर्षांच्या योद्‌ध्यासोबत... समस्त बारामतीकर’ असा या फ्लेक्‍सवर मजकूर होता. कोणाच्या सूचनेनंतर हा फ्लेक्‍स उतरविला गेला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar Flex remove in baramati