

Sharad Pawar health update news
esakal
Sharad Pawar : खासदार शरद पवार यांची तब्येत उत्तम असून उद्या (ता.२५) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनीक येथे उपचार सुरू असलेल्या शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की, त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाले होते. मात्र योग्य उपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे.