शरद पवार घेणार कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 'जम्बो' बैठक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत जोरदार टीका होत आहे. या पार्श्‍वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसमवेत ते बैठक घेणार असून, त्यात परिस्थिती नियंत्रणात कशी आणता येईल, यावर चर्चा करण्यात येणार आहे. 

पुणे - शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत जोरदार टीका होत आहे. या पार्श्‍वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसमवेत ते बैठक घेणार असून, त्यात परिस्थिती नियंत्रणात कशी आणता येईल, यावर चर्चा करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर सर्व खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींसमवेत बैठकीत चर्चा करणार आहेत. 

दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा होणार की नाही? शिक्षणमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत

पुणे शहर, जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. याबाबत महापालिका, जिल्हा प्रशासन आणि विभागीय आयुक्‍त कार्यालयाकडून पाच महिन्यांपासून उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांत महापालिकेचे आयुक्‍त बदलले. तत्कालीन जिल्हाधिकारी यांची पंतप्रधान कार्यालयात नेमणूक झाली. विभागीय आयुक्‍तही नवे आले. परंतु प्रशासनाला कोरोनाचा प्रसार रोखणे अद्याप शक्‍य झालेले नाही. 

महत्वाची बातमी : बलात्कार प्रकरणे लागणार लवकरच तडीस, कारण...

उपमुख्यमंत्री अजित पवार हे दर आठवड्याला शुक्रवारी स्वत: प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेत आहेत. निधीची कमतरता नाही. शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करा, अशा सूचना देत आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड शहरात जम्बो कोविड रुग्णालये उभारण्यात आली. परंतु ज्या एजन्सीला काम देण्यात आले, ती पुरेशी सक्षम निघाली नाही. महापालिका आणि राज्य सरकारला डॉक्‍टर्स, नर्सेससह आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध करणे शक्‍य झालेले नाही. परिणामी रुग्णांना आयसीयू व्हेंटिलेटर बेड्‌स उपलब्ध होत नसून, योग्य उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पवार या बैठकीत झाडाझडती घेण्याची शक्‍यता आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar to hold Jumbo meeting on the backdrop of Corona