
पुणे : ‘‘गांधी, नेहरूंच्या विचारांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या उल्हास पवार यांनी आयुष्यभर कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. राजकारणात राहूनही सर्व पक्षांशी सुसंवाद राखण्याचे काम त्यांनी कायम काम केले. त्यांनी गांधी, नेहरूंच्या विचारांची बांधिलकी सातत्याने जपली आहे,’’ अशा शब्दांत उल्हास पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी गौरव केला.