Sharad Pawar
sakal
Pune: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी 'एक्स'वरील पोस्टच्या माध्यमातून दिली. पवार यांची प्रकृती उत्तम असून, त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा