शरद पवार साहेबांची भेट झाली म्हणजे माझी बावीस वर्षांची तपश्‍चर्या सार्थकी लागली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

गोविंदबागेत १६ तारखेला प्रथमच आपली पवारसाहेबांबरोबर भेट झाली. साहेबांनी खांद्यावर हात टाकून आस्थेने आपली चौकशी केली. हार घालून सत्कार केला. २२ वर्षांत पहिल्यांदा साहेबांची भेट केवळ ‘सकाळ’मध्ये बातमी आल्यानंतर झाली. ही भेट आपल्या आयुष्यातील भाग्यशाली भेट आहे. जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत माझी निलंगा ते काटेवाडी, अशी सायकलवारी सुरूच राहणार.
- अब्दुल खडके, निलंगा, जि. लातूर

निमगाव केतकी - यंदा पवारसाहेबांची भेट होईल, असे ध्यानीमनीही नव्हते. परंतु, ‘सकाळ’मध्ये बातमी आली आणि माझी २२ वर्षांची तपश्‍चर्या सार्थ झाल्याची भावना लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील ६५ वर्षीय अब्दुलगनी खडके यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अब्दुलभाई दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार याचे जन्मगाव असलेल्या काटेवाडीला ३१० किलोमीटर अंतर सायकलवर पार करून १२ डिसेंबरला येत असतात. आत्तापर्यंत त्यांची व साहेबांची कधीच भेट झालेली नव्हती. पवारसाहेबांचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. अब्दुलभाई विद्यार्थिदशेत असल्यापासून पवारसाहेबांवर प्रेम करतात. साहेब हे लोकनेते आहेत. 

‘आयटी पार्कची कोंडी कशामुळे?’

गोरगरिबांचे कैवारी आहेत. जाणता राजा आहेत. त्यांना जास्तीत जास्त लोकांची सेवा घडावी, यासाठी त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, एवढी अपेक्षा ठेवून अब्दुलभाई मागील बावीस वर्षांपासून ३१० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करीत साहेबांच्या जन्मदिनी जन्मगावी काटेवाडीला येत आहेत. साहेबांची मात्र त्यांची कधीच भेट झालेली नव्हती.

पिंपरीत आंदोलनस्थळी अशी असेल पार्किंग व्यवस्था

यंदा ते काटेवाडीला जात असताना निमगाव केतकीत भेट झाली. बुधवारी (ता. ११) ‘सकाळ’च्या अंकात ‘शरद पवार यांच्यासाठी सायकलवारी’ या आशयाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर ती व्हायरल झाली. चॅनेलवाल्यांनी याची दखल घेतली.

आळंदीत रस्त्यावरच मुऴशी पॅटर्नचा थरार; पाहून बसेल धक्का!

अब्दुलभाई म्हणाले की, ‘सकाळ’मध्ये बातमी आल्यानंतर अनेकांनी आपली भेट घेतली. या उपक्रमाचे खूप कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व कार्यकर्त्यांनी साहेब १६ तारखेला बारामतीला येणार आहेत. तुम्हीची भेट घालून देतो, असे सांगून माझी चार दिवस पक्षाच्या कार्यालयात खूप छान 
व्यवस्था केली.

‘सकाळ’मध्ये अब्दुलभाईंची बातमी आल्यानंतर अजित पवार यांनी अब्दुलभाईंना नवीन सायकल भेट दिली. त्यांचा सत्कार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar meet abdulgani khadake