
In solidarity with distressed farmers, Sharad Pawar's party opts for 'Black Diwali.'
Sakal
माळेगाव : महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने पिकांबरोबर शेत जमीनही वाहून गेली. शेती ही शेतकर्याचे सर्वस्व असते. त्यामुळे शेतकरी कमालीचा अस्वस्थ आहे. संकटात सापडलेला शेतकरी अशा मनस्थितीत दिवाळी साजरी करू शकत नाही. त्यांच्या दुखःत आमच्या पक्ष संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत आज स्पष्ट केली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पवार यांनी हा सण साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला.