Sharad Pawar On Caste : माझी जात सगळ्यांना माहीत आहे; शरद पवार

राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे.
Sharad Pawar On Caste everyone knows my caste sharad pawar as caste document goes viral
Sharad Pawar On Caste everyone knows my caste sharad pawar as caste document goes viralEsakal

बारामती : राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. त्यातच शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर ओबीसी उल्लेख असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पवार यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. माझी जात कोणती आहे हे सर्वांना माहिती आहे. जन्माने मिळालेली जात लपूच शकत नाही, असे ते म्हणाले.

दिवाळीच्या पाडव्यानिमित्त राज्यभरातील नागरिक आणि कार्यकर्ते शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाले. या गाठीभेटींच्या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली.

त्यावेळी समाज माध्यमावर शरद पवार यांनी मएसोतील शाळा सोडलेल्या दाखल्यावर मराठा म्हणून जातीचा उल्लेख, तर दुसरीकडे ओबीसी असल्याचा एक दाखला व्हायरल होत असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवारांनी दाखल्याबाबत स्पष्टीकरण देत विरोधकांवर निशाणा साधला.

जात लपू शकत नाही माझ्या जातीचा उल्लेख असलेला शाळेचा दाखला फिरवला जात आहे तो खरा असल्याचे पवारांनी सांगितले. ते म्हणाले, ‘मी मराठा एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये होतो. त्या शाळेचा दाखला खरा आहे.

त्यावरील जात, धर्माचा केलेला उल्लेख खरा आहे. मात्र, काही लोकांनी इंग्रजीतील माझ्या जातीपुढे ओबीसी लिहून दुसरा दाखला फिरवला. मला ओबीसी वर्गाबद्दल आदर आणि आस्था आहे. जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपू शकत नाही.

सर्व जनतेला माझी जात कोणती आहे हे माहिती आहे. मात्र, पण जात-धर्म याविषयावर मी कधी समाजकारण आणि राजकारण केले नाही. त्या समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जो काही हातभार लावायचा तो मी लावेल.’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

ओबीसी-मराठा वाद नाही

आरक्षणावरून राज्यात ओबीसी आणि मराठा समाज समो रासमोर ठाकले आहेत. यावर बोलताना पवारांनी तसे वातावरण निर्माण केल्याचे स्पष्ट केले. शरद पवार म्हणाले, ‘राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजबांधवामध्ये वाद नाहीत.

ते वाद निर्माण करण्याचे काही जणांकडून प्रयत्न केले जात आहेत. आपले प्रश्न तत्काळ सुटले पाहिजे, अशीच भावना सर्व सामान्य लोकांची असते. त्यांचे न्याय्य प्रश्न सोडविण्याची कामगिरी ही राज्य आणि केंद्राने करावी.’ अशी अपेक्षाही पवारांनी यावेळी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com