

NCP chief Sharad Pawar reacts to the Pune DJ controversy
esakal
पुणे : गणेशोत्सवातील डीजेच्या वाढत्या आवाजावरून सुरू असलेल्या वादाला आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ३ सप्टेंबर रोजी पुण्यात विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही पवार यांनी निषेध केला. सण आनंद देणारा आणि सुखद वातावरण निर्माण करणारा असावा, मात्र डीजेचा मोठा आवाज आणि रस्त्यांवरील कार्यक्रमांमुळे सणाचे गांभीर्य कमी होण्यास मदत होते, असे त्यांनी म्हटले.