शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केला की पुरंदर विमानतळामुळे विकास होऊन नवे चित्र दिसेल, जसे नवी मुंबईत घडले.
त्यांनी स्पष्ट केले की फक्त शेतीवर न थांबता उद्योगधंदे, व्यवसायात उतरणे ही काळाची गरज आहे.
पुणे व आसपासच्या भागाला स्वतंत्र विमानतळाचा मोठा फायदा होईल, पण त्यासाठी जमीन आवश्यक आहे.
केवळ शेती करुन चालणार नाही. उद्योगधंदे, व्यवसायात देखील उतरले पाहिजे.हेलिकॉप्टरमधून पनवेलजवळ नवे चित्र दिसते कारण तिथे नवी मुंबईचे विमानतळ होणार आहे. असे चित्र पुरंदर विमानतळाचे असणार आहे, मात्र त्यासाठी जमीन लागणार आहे, अस शरद पवार यांनी सांगितले. ते पुण्यातील उरुळी कांचनमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.