

Sharad Pawar Raises Farmers Loan Relief Issue Asks Government Why Industrialists Get Benefits While Farmers Are Left Out
sakal
पुणे: ‘‘देशात कर्जाशी निगडित सवलती देताना उद्योगपतींचा विचार केला जातो. मग, काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत,’’ अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मांडली. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ६६ व्या वार्षिक अधिवेशनाचे मांजरी फार्मजवळील लक्ष्मी लॉन्स येथे उद्घाटन करताना ते बोलत होते.