...आणि आमच्या मातोश्री पुणे लोकल बोर्डावर निवडुन आल्या

केशवराव जेधे यांनी काँग्रेस तळागाळात पोहचण्यासाठी अपार कष्ट केले जिथे वैचारिक भुमिका घेण्याची आवश्यतकता होती तिथे त्यांनी निर्धारपणे घेतली
sharad pawar
sharad pawarsakal media

पुणे : केशवराव जेधे यांनी काँग्रेस तळागाळात पोहचण्यासाठी अपार कष्ट केले. जिथे वैचारिक भुमिका घेण्याची आवश्यतकता होती तिथे त्यांनी निर्धारपणे घेतली. केशवराव यांचा पिंड सामान्य माणसाशी जुळणारा होता, अशा भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात व्यक्त केल्या.

sharad pawar
Farmers Protest: 29 नोव्हेंबरला शेतकरी संसदेकडे कूच करणार

देशभक्त केशवराव जेधे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. य. दि फडके लिखित केशवराव जेधे चरित्र पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. या पुस्तकाची प्रस्तावना शरद पवार यांनी लिहली आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर हमाल माथाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव, सर्जेराव जेधे, केशवराव जेधे फाउंडेशन चे अध्यक्ष दिग्विजय जेधे, राजलक्ष्मी जेधे, अनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार यांनी केशवराव जेधे यांच्या कालखंडाचा आढावा घेत सांगितले की, केशवराव यांच्या या चरित्रातुन महाराष्ट्राच्या 1920 ते 1954 पर्यंतच्या राजकीय कालखंड समजतो. जेधे यांनी काँग्रेस तळागाळात पोहचण्यासाठी अपार कष्ट केले. जिथे वैचारिक भुमिका घेण्याची आवश्यतकता होती तिथे त्यांनी निर्धारपणे घेतली. केशवराव यांचा पिंड सामान्य माणसाशी जुळणारा होता. ब्रिटिशांना या देशातून घालवण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी करुन या लढ्यात उतरले.

sharad pawar
शाहरुखच्या संघातून चमकलेल्या हिरोला टीम इंडियात 'मौका'

केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळ्याव्याच्या माध्यमातून तरुण पिढी घडवण्याचे कार्य केले. पुणे महापालिकेत निवडुन गेल्यावर जेधे यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आपली भुमिका मांडली. मुला मुलींना शिक्षण देणे आणि दलितांसाठी पाणवठे सार्वजनिक करणे, असे ठराव मांडले. दुर्देवाने दोन्ही नामंजुर करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

पुढे त्यांनी केशवराव जेधे यांच्यामुळे आपल्या मातोश्री यांना तिकीट भेटल्याच्या किस्सा सांगितला. पुणे जिल्ह्यातुन तेव्हा लोकल बोर्डातुन महिलांसाठी एकच जागा राखीव होती. त्या जागेसाठी केशवराव यांनी आमच्या मातोश्री शारदाबाई यांना तिकीट दिले आणि त्या पुणे लोकल बोर्डावर निवडुन आल्याची आठवन यावेळी पवार यांनी आवर्जून सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com