आपल्यासमोर अर्थिक संकट; ४० टक्के उत्पन्न कमी होणार : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 एप्रिल 2020

राज्याचे येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम सरकारच्या कामावर होणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले.

मुंबई : राज्याचे येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम सरकारच्या कामावर होणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले. त्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. राज्यसमोर आर्थिक संकट उभं राहणार असून आपल्यासाठी ते महत्त्वाचं असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार म्हणाले, ४० दिवसांपासून सगळं काही बंद आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या, शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे. मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारचा २०२०-२१ चा जो अर्थसंलकल्प होता त्यात एकंदर राज्याचं महसूल उत्पन्न ३ लाख ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल असं चित्र दिसतंय. पण आज सुधारित माहिती घेतली असता महसूलात तूट पडेल असं स्पष्ट दिसत आहे. ही तूट १ लक्ष ४० हजार कोटी इतकी असेल. याचा अर्थ एकूण उत्पन्नाच्या ४० टक्के उत्तन्न कमी होणार हे स्पष्ट आहे. 

Coronavirus : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात

'लॉकडाउनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प असून याचा विपरित परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होणार आहे. अनेकांच्या नोकरी, कामावरही गदा येण्याची शक्यता आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे. यानंतर लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास कोणीही रस्त्यांवर गर्दी करण्याची गरज नाही, असेही पवार म्हणाले. आपल्यासमोर आर्थिक संकट उभं राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे असं आवाहनही केलं. सोबतच मुंबई, पुण्यात महापालिका आणि शासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई, पुणे या ठिकाणी कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. औरंगाबाद आणि जळगावसारख्या ठिकाणीही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. आपल्याला आता आरोग्यासह आर्थिक संकटाचाही सामना करावा लागणार आहे, असेही पवार म्हणाले.

१५ हजारांपेक्षा कमी पगार असणारांसाठी खूशखबर ! केंद्र सरकारने आणली 'ही' योजना 

३ मेला लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे. ४ तारखेपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळण्याचीही शक्यता आहे. ४ तारखेपासूनच्या नव्या गाइडलाइन्स सरकार लवकरच जाहीर करेल. त्यामुळे लॉकडाउन शिथिल केलं म्हणून लगेच सर्वांनी घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही. शासन ज्या काही सुचना करेल त्या कटाक्षानं पाळल्या पाहिजेत, असंही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar speak On Facebook Live today