esakal | शरद पवारांनी सांगितले अन् मी राजीनामा दिला : श्रीनिवास पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar and shriniwas patil

शरद पवारांनी सांगितले अन् मी राजीनामा दिला : श्रीनिवास पाटील

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कॉलेजमध्ये असतानाच शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांनी राजकारणात जायचं ठरवले होते. वयाच्या 26 व्या वर्षी शरद पवारांना तशी संधी देखील मिळाली आणि ते विधानसभेवर निवडून गेले. परंतु श्रीनिवास पाटील यांनी मात्र वेगळा मार्ग निवडला. त्यासंबंधीचा किस्सा आज एका मुलाखती दरम्यान पवार यांनी सांगितला.

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांच्या जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे 'पुणे एकेकाळी' या कॉफीटेबल बुकचे आज प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

यावेळी 'आठवणीतले पुणे' या विषयावर मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांना बोलतं केलं. या मुलाखती दरम्यान दोघांनीही आपल्या कॉलेज जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

पवार म्हणाले, 'श्रीनिवास पाटील यांचं गाव कराड. त्यावेळी यशवंतराव चव्हाण, य़शवंतराव मोहीते, आनंदराव चव्हाण यांच्यासारखे मोठे नेते कराडचे असल्याने मला संधी मिळण्याची शक्यता कमी असे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी एमपीएससी परिक्षा देऊन अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी मी त्यांच्याकडून मी ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी राजीनामा द्यायचा अशी कमिटमेंट घेतली. श्रीनिवास पाटील नंतर जिल्हाधिकारी झाले, सचिव झाले. नंतरच्या काळात मी वेगळा पक्ष काढल्यानंतर आमच्याकडे उमेदवार नव्हता. त्यावेळी पाटील यांना मुंबईला बोलावुन घेतलं. मुंबईला आल्यानंतर मी त्यांना मंत्रालयात जा आणि राजीनामा देऊन ये असं सांगितलं. राजीनामा देऊन आल्यानंतर त्यांना कराडला जाऊन फॉर्म भरायला सांगितलं. श्रीनिवास पाटील यांनी फॉर्म भरला आणि साडेतीन लाख मतांनी लोकसभेवर निवडून आले.'

loading image
go to top