वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पुणे : देशात अन्नधान्याची गरज वाढत असल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढवणे शक्य नाही. परंतु त्याऐवजी उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा लागेल. त्यासाठी या उद्योगाशी संबंधित संशोधन संस्था आणि शेतकरी यांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. तसेच, केंद्र सरकारने संशोधनावर अधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने शुक्रवारी (ता. 31) आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या परिषदेस इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ. होजे आरिव्ह, पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, शंकरराव गडाख, सतेज पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, इस्माचे अध्यक्ष विवेक पिट्टी आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट राज्यातीलच नव्हे तर देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. साखर उद्योगाशी संबंधित संशोधन क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रमाण खूप कमी आहे. भविष्यात साखर, इथेनॉल आणि विजेची गरज पाहता हीच परिस्थिती राहिल्यास साखर उद्योग ही आव्हाने पेलू शकणार नाही. त्यामुळे संशोधन क्षेत्रात अधिक गुंतवणूक होणे गरजेचे असून, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. साखरेच्या बाजारातील चढ-उतार वातावरणातील बदल आणि कमी पाण्यामध्ये चांगले उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जातीचे संशोधन होण्याची गरज आहे साखर उद्योगाच्या वाढीसाठी सर्व घटकांनी एकत्रित येण्याची गरज आहे. महाराष्ट्रासह सर्व राज्यांना साखरेच्या निर्यातीवर भर द्यावा लागेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar speaks at Vasantdada sugar institute program Pune