
काटेवाडी : ‘‘जेव्हा पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते, त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे शिष्टमंडळ गेले होते. त्या शिष्टमंडळातील एक सदस्य मीही होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न जेव्हा येतात, तेव्हा पक्षीय भूमिका घ्यायची नसते. हे जसे नरसिंहराव यांच्या काळामध्ये झाले, तसेच आजही होत आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये कोणीही पक्षीय भूमिका आणू नयेत,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.