esakal | Video : शरद पवार म्हणाले, 'होय, मी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन लस घेतली!'
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad_Pawar

कोरोनाची प्रतिबंधात्मक लस जानेवारीच्या अखेरीस तयार होईल. प्रतिकार क्षमता वाढवणारी ही लस आहे. मी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आज लस घेतली आहे.

Video : शरद पवार म्हणाले, 'होय, मी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन लस घेतली!'

sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शुक्रवारी (ता.२) लस घेतल्याचे सांगितले, पण ही लस कोरोनाची नसून ती 'आर. बीसीजी' प्रतिकारक्षमता वाढवणारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पवार यांनी सकाळी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन कोरोना लसीबाबतचा आढावा घेतला‌. त्यानंतर त्यांनी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे पत्रकारांशी दिलखुलास चर्चा केली.

राज्यमंत्री भरणे यांच्या घरासमोर मराठा समाजाचा `आक्रोश`​

या संदर्भात विचारले असता पवार म्हणाले, "कोरोनाची प्रतिबंधात्मक लस जानेवारीच्या अखेरीस तयार होईल. प्रतिकार क्षमता वाढवणारी ही लस आहे. मी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आज लस घेतली आहे, पण ही लस कोरोनाची नसून प्रतिकारक्षमता वाढणारी आहे. ही लस सर्वसामान्यांनाही उपलब्ध आहे. मी कोठेही  गेलो, तर लोक खासगीत बोलतात, यांना काही होणार नाही. पुनावाला त्यांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी मागेच लस घेतली आहे, म्हणून ते एवढे बिनधास्त फिरत आहेत. अनेकांना हे खरे वाटते; परंतु त्यात तथ्य नाही."

राज्यात सरकार अस्थीर आहे का?
चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सत्तांतर होण्यासंदर्भात सातत्याने वक्तव्ये केली आहेत. या संदर्भात शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, 'राज्यात अशा प्रकारे सत्तांतर होईल, अशी आशा त्यांना आहे. या आशेवर त्यांनी पुढची साडे चार वर्षे काढावीत म्हणजे त्यांची साडेचार वर्षे चांगली जातील. बाबरी मशीद प्रकरणात लालकृष्ण अडवानी यांच्या सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यात आलंय. त्यावर पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, सगळ्या प्रकारचे पुरावे देऊनसुद्धा असा निकाल दिला जातो, याचं मला आश्चर्य वाटतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)