esakal | राज्यमंत्री भरणे यांच्या घरासमोर मराठा समाजाचा `आक्रोश`
sakal

बोलून बातमी शोधा

indapur.jpg


मराठा समाजाची ठामपणे भूमिका मांडण्याची भरणे यांनी दिली ग्वाही

राज्यमंत्री भरणे यांच्या घरासमोर मराठा समाजाचा `आक्रोश`

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे व मराठा समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्यासाठी भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर मराठा क्रांती मोर्चा इंदापूर तालुक्याच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. भरणे यांनीही आंदोलनामध्ये सहभागी होवून मराठा समाजाची भूमिका ठामपणे मांडण्याची ग्वाही दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

न्यायालयाने मराठा आरक्षणला स्थगिती दिल्यामुळे राज्यभर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन सुरु झाली आहेत. मराठा समाजाचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांच्या घरासमोर मराठा समाजातील युवक आक्रोश आंदोलने करीत आहेत. आज शुक्रवार (ता. २) रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोर इंदापूर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यातून आक्रोश आंदाेलन केले. यावेळी युवकांनी राज्यमंत्री भरणे यांना मराठा समाजाची भूमिका  सरकारकडे ठामपणे मांडून  हक्काचे आरक्षण मिळवून देण्याची मागणी केली.

चाकू, कोयत्याचा धाक दाखवून कार व पैसे केले लंपास; तिघांना अटक

यावेळी भरणे यांनी ही मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देवून आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी भरणे यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाच्या आंदोलनास माझा पाठिंबा असून मराठा समाजाची भूमिका सरकारकडे ठामपणे मांडणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादीचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ही आरक्षणासाठी पाठपुरावा सुरु आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आरक्षणाचा विषय हातळत असून न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने कोणती भूमिका मांडायची याची टिपणी तयार करण्याचे काम सुरु आहे.

पुण्यात शिवसेना नेत्याच्या हत्येनं खळबळ; मध्यरात्री धारधार शस्त्रांनी हल्ला

यावेळी भरणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणला पाठिंबा असल्याचे पत्र दिले. आंदोलनाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, इंदापूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, भिगवणचे सहयक पोलिस निरीक्षक जीवन माने उपस्थित होते. भरणे यांच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 

loading image