vishal tambe and shrikant patil
sakal
पुणे - शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व कॉंग्रेस पक्षाच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही शहरासाठी दोन शहराध्यक्ष नियुक्तीची भूमिका घेतली आहे. त्यानुसार पुणे शहर पश्चिम शहराध्यक्षपदी विशाल तांबे यांची, तर पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांची शहराच्या पूर्व शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तांबे व पाटील यांच्या नियुक्तीचे पत्र मंगळवारी जाहीर केले.