अनेकांना वाटल होतं मी निवृत्त होईल, पण तसे झालं नाही : शरद पवार

Sharat Pawar speaks at Agriculture exhibition 2020 at Baramati
Sharat Pawar speaks at Agriculture exhibition 2020 at Baramati

बारामती : कृषी प्रदर्शनाच्या उद्धाटनाला सुरवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला पुष्पगुच्छ दिल्याने मी निवृत्त व्हावे असे मला म्हणत आहेत की काय असे वाटले. अनेकांनाही तसे वाटत होते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगाविला. 

बारामती अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बहुचर्चित 'कृषिक 2020'चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता आमीर खान, कृषीमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आदी पदाधिकारी उपस्थित आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबवित असलेले आधुनिक तंत्रज्ञान, शेती व शेतीपूरक व्यवसायाची निगडित सर्व विषयावरची माहिती उपस्थित मान्यवरांना अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

शरद पवार म्हणाले, की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ दिल्यानंतर वाटले, की मला निवृत्त व्हा असे म्हणत आहेत की काय? अनेकांना वाटत होते, मी निवृत्त होईल, पण तसे काही घडले नाही. महाराष्ट्रातील जनतेने तसे घडून दिले नाही.

इंडोनेशियातील वाणाचा भारतातील शेतकऱ्यांना झाला आहे. सात ते आठ लाख शेतकरी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतील. दरवेळी शेती प्रदर्शनात बदल होत आहेत. राज्याच्या अन्य भागातील शेतीमध्ये याचा फायदा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com