esakal | Pune : शशिकांत पवार यांना कोणालाही नियमबाह्य पद्धतीने काढण्याचा अधिकार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

rajendra Kondhare

शशिकांत पवार यांना कोणालाही नियमबाह्य पद्धतीने काढण्याचा अधिकार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांच अध्यक्षपदाचे सर्व अधिकार विशेष सर्वसाधारण सभेने गोठविले आहेत. त्यामुळे त्यांना लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना बरखास्त करण्याचा अधिकार घटनेनुसार नाही. तसेच विशेष सर्वसाधारण सभेने पवार यांची अध्यक्षपदाची गोठवलेले अधिकार एकमताने महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांना देण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे गुरुवारपासून होणार खुली; डॉ. राजेश देशमुख

मराठा महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत तीन महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये शशिकांत पवार यांनी नियमबाह्य पद्धतीने अधिकाराचा दुरुपयोग करून लाभलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. राज्यव्यापी मराठा संपर्क अभियानाची सुरवात करणे, युवक, विद्यार्थी, उद्योजक, संघटना वाढविण्यासाठी निर्णय घेणे, राज्यातील जिल्हा आणि तालुका पातळीवर लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नोंद घेऊन त्यांना मान्यता देण्यात आली. तसेच, अखिल भारतीय मराठा महासंघ मध्यवर्ती कार्यालयाच्या मुंबई येथील इमारत पुनर्विकास गैरव्यवहाराबाबत लेखी माहिती देऊन सभासदांच्या उपस्थितीत संस्थेच्या आर्थिक व्यवहार आणि नुकसानीची नोंद घेऊन पवार यांचे अध्यक्षपदाचे सर्व अधिकारी गोठविले आहेत. त्यामुळे पवार यांनी काढलेल्या पत्रकाला कायदेशीर अर्थ नाही, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांनी पवार यांनी केलेला बेकायदा करार आणि इतर कागदपत्रांची मागणी त्यांच्याकडे केली असता, त्यांनी जाणूनबुजून कोणतीही माहिती पदाधिकाऱ्यांना दिलेली नाही. त्यांनी पदाचा गैरवापर करून केलेले दस्तावेज योग्य आहेत, हे एखाद्या वास्तुविशारद किंवा वकिलांकडून जाहीर करावे, अशी मागणी कोंढरे यांनी केली.

loading image
go to top