पुणे: मराठा समाज झालं की ओबीसी, ओबीसी झालं की धनगर समाज... आश्वासन देता पण ती पूर्ण करत नाही. दहा-बारा वर्षं सत्तेत राहूनही मार्ग काढता आला नाही, तर सत्ता शरद पवार यांच्याकडे द्या, ते नक्की मार्ग काढतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.