
Pune Traffic Update
Sakal
वडगाव शेरी : येरवड्यातील शास्त्रीनगर चौक उड्डाण पुलाच्या कामाला या आठवड्यात सुरुवात होणार असल्याने या चौकातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. तसेच नगर रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुरू आहेत. या कामांची पाहणी करून अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि आमदार बापू पठारे यांनी नुकताच आढावा घेतला. तसेच प्रस्तावित उपाययोजनांची माहिती घेऊन सूचना दिल्या.