कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 207 वा शौर्य दिन साजरा होत आहे. कोरेगाव भीमा विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. यंदा आठ ते दहा लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विजय स्तंभास अभिवादन केले.