esakal | कुरकुंभ परिसरात केमिकलमिश्रीत पाणी पिऊन 11 मेंढ्यांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

कुरकुंभ परिसरात केमिकलमिश्रीत पाणी पिऊन 11 मेंढ्यांचा मृत्यू

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत बुधवारी (ता. 28) दुपारी साडेचारच्या सुमारास रस्त्याने वाहणारे केमिकलमिश्रीत सांडपाणी प्यायल्याने पाटस मोटेवाडा येथील मेंढपाळांच्या अकरा मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.

कुरकुंभ परिसरात केमिकलमिश्रीत पाणी पिऊन 11 मेंढ्यांचा मृत्यू

sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत बुधवारी (ता. 28) दुपारी साडेचारच्या सुमारास रस्त्याने वाहणारे केमिकलमिश्रीत सांडपाणी प्यायल्याने पाटस मोटेवाडा येथील मेंढपाळांच्या अकरा मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. आणखी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मेलेल्या मेंढयांची अंदाजे अडीच लाख रूपये नुकसान झाले आहे. मात्र कोणत्या कंपनीने उघडयावर सोडलेल्या सांडपाण्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे समजू शकले नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटस (ता. दौंड)  मोटेवाडा येथील मेंढपाळ रामा शिवा बरकडे, लाला आबा बरकडे हे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील मोकळ्या   शेतांमध्ये मेंढ्या चारून रस्त्याने जात होते. त्यावेळी मेंढ्या वसाहतीतील रस्त्याने वाहणारे केमिकलमिश्रीत सांडपाणी पेल्याने काही वेळातच अकरा मेंढयांचा पोट फुगून मृत्यू झाला.

दरम्यान, ही संख्या आणखी वाढण्याची भिती मेंढपाळांनी व्यक्त केली आहे. अकरा मेंढ्या मेल्याने अंदाजे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना वसाहतीतील मिरा केमिकल कंपनीच्याजवळ घडली आहे. मात्र रस्त्याने वाहणारे केमिकलमिश्रीत सांडपाणी कोणत्या कंपनीचे आहे ते समजू शकले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रशासनाने केमिकलमिश्रीत पाणी पिऊन मृत्यू झालेल्या मेंढ्याचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी करून दोषी कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

loading image