

Sheetal Tejwani
esakal
Pune Latest News: मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीच्या बँका खात्यात ३०० कोटी रुपयांचे व्यवहार झालेले दिसत नाहीत. तिने ही रक्कम रोखीने घेतली का? किंवा हा व्यवहार नेमका कसा झाला, याबाब ती पोलिसांची दिशाभूल करत आहे. तिचा ‘अमेडिया इंटरप्रायझेस एलएलपी कंपनी’शी कसा संपर्क झाला. तिने कोणाच्या ओळखीने जमिनीचा व्यवहार केला, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी (ता. ११) न्यायालयास दिली.